• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र

आपली सर्वांची लाडकी कु.आराध्या किरण करेवाड हिचा वाढदिवस हिरण्यगर्भ तर्फे एका अनाथ आश्रमात साजरा करण्यात आला.

Posted By: admin 0 Comment

6-08-2018

आपली सर्वांची लाडकी कु.आराध्या किरण करेवाड हिचा तिसरा वाढदिवस भायंदर येथील एका अनाथ आश्रमात उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आश्रमातील बालकांना हिरण्यगर्भ चे अध्यक्ष श्री नारायण करेवाड यांच्या हस्ते
शालेय साहित्य (वह्या, पेन, भुमीती संच),
वस्त्र (T shirts), फळे वाटप करण्यात आले.
वाढदिवस साजरा झाल्यानंतर मुलांना हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी तर्फे सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.या बालकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून समाधान वाटले.
समाजात असे बरेच व्यक्ती व संस्था आहेत ज्या अनाथ मुलांसाठी, निराधार वृद्धांसाठी, पिडितांसाठी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. खरचं अशा व्यक्ती व संस्थाच्या कार्याला सलाम केला पाहिजे.

 

आपल्या चिमुकल्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही सामाजिक उपक्रम आपण हिरण्यगर्भ च्या मार्फत करत असतो. असाच फुल ना फुलाची पाकळी या उपक्रमाने आपण करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान खंबीर होऊन समाजातील अशा घटकासाठी कार्य करेल असा संकल्प व सदिच्छा या क्षणी आहेत..

 

Leave a Comment