जय श्रीराम
जय बजरंगबली
” तोचि खरा पहिलवान, देहउन्नती साधुनि पूर्ण.
सेवेसाठी अर्पितो जिवन, हनुमंतापरी ॥”
सिरंजणी गावातील व पंचक्रोशीतील बलोपासना जोपासणाऱ्या तरुणाईला आवाहन करण्यात येते की, हनुमान जयंतीचे औचित्य साधून,
हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान सिरंजणीच्या सौजन्याने पैलवान कै. किशन ( बाबड्या ) नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्थळ
“गोकुळ निवास” जवळ,
हिमायतनगर सिरंजणी रोड,
सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड
दिनांक ८ एप्रिल शनिवार रोजी
दुपारी १२ नंतर….
प्रथम पारितोषिक मानाची चंदेरी गदा व रोख रक्कम
२००० / १०००/ ५०० / २०० रुपयाच्या अनेक कुस्त्या व तसेच ५० विजयी पहिलवानास आकर्षक विजयचिन्ह हे पारितोषिक स्वरुपात देण्यात येईल.
त्याचबरोबर, पंचक्रोशीत आखाडे गाजवून सिरंजणी गावाचे नाव लौकिक करणारे ज्येष्ठ पैलवान आणि आदर्श समाजकार्य करणार्या गावातील ज्येष्ठ व्यक्तीमत्वांना हिरण्यगर्भ जीवनगौरव पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या आदरणीय व्यक्तींची नावे खालील प्रमाणे आहेत.
क्रिडा(कुस्ती) क्षेत्रात
१) पै. श्री जयवंतराव दावजी देशमाने
२) पै. श्री रामा काशिबा सुर्यवंशी
३) पै. श्री बब्रुवाहन भुमाजी गड्डमवार
सामाजिक क्षेत्रात
१) श्री संभाजी लक्ष्मण सुरोसे
(सेवानिवृत्त पोलीस पाटील)
२) श्री भिमराव गेंदाजी कावळे
(सेवानिवृत्त वनाधिकारी)
तरी हिमायतनगर तालुक्यातील सर्व कुस्ती प्रेमींनी या भव्य सोहळ्यास उपस्थिती लावून आनंद घ्यावा.
नियम व अटी :-
१. स्पर्धकाने वेळेचे गांभीर्य ठेवून वेळेवर उपस्थित रहावे.
२. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद केल्यास स्पर्धक बाद केल्या जाईल.
३. शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी स्पर्धकाची पात्रता ठरवण्याचे अधिकार स्पर्धा समितीकडे आणि पंचाकडे असतील. पात्रतेसाठी स्पर्धकांचा युक्तिवाद चालणार नाही.
४. पराभूत स्पर्धकांना कोणतेही मानधन मिळणार नाही.
५. स्पर्धेत किरकोळ जखमेवर प्राथमिक उपचार केले जातील, पण गंभीर जखम आणि जीविताची जबाबदारी स्पर्धाकांची स्वतःची असेल.
आयोजक:
हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान
आणि समस्त गावकरी मंडळी सिरंजणी
संपर्क
८७६६७७३८७२ / ८८०५३८५३५३