एक काळ होता वाढदिवस यायचे-जायचे कळायचं पण नाही. १२ वी होईपर्यंत माझ्या सोबत असे व्हायचे, वाढदिवसाची तारिख गेल्यावर आठवायचे आपण एक वर्ष अजून मोठे झालो..! पण नंतर मित्रपरिवार वाढला व वाढदिवस उल्हासात,जल्लोषात साजरे होत आहेत.
येणाऱ्या २ एप्रिल ला माझा ३६ वा वाढदिवस साधेपणाने व्हावा आणि आपल्यांचे पैसे व्यर्थ खर्च होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे.
या निमित्ताने तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की वाढदिवसासाठी फुलांचे बुके, केक, भेटवस्तू, डिजिटल बॅनर इत्यादी गोष्टींसाठी पैसे व्यर्थ खर्च करु नका.
तुमच्या शुभेच्छा, स्नेह व आशिर्वाद नेहमी सोबत आहेतच पण वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद “शब्दात” फोन, मेसेज किंवा सोशल मेडिया द्वारे व्यक्त करु शकता.
मित्रांनो, २०० रुपयाचा सकाळी दिलेला फुलांचा बुके संध्याकाळी सुकुन जाईल, ५०० रुपयाचा केक २० मिनिटात फस्त होईल ( मागच्या वर्षी जवळपास ८ केक फस्त झाले होते 😊, या वर्षी ही संख्या १-२ वर आली तर जवळपास ३००० रुपयांची बचत होईल ) पण १०० रुपयाचे शालेय साहित्य एखाद्या गरिब, होतकरु, चिमुकल्या विद्यार्थ्यांला दिले तर तो आनंदाने फुलून जाईल आणि त्याची कृतज्ञता मनात ठेवेन. १०० रुपयाचे अन्न जर एखाद्या गरजू भुकेल्याच्या पोटात पडेल तर तो तृप्त होऊन आशिर्वाद देईल. आणि किमान इतके कळण्याइतपत सामाजिक संवेदना आपल्यात असायलाच हवी. वाढदिवसात बचत झालेले पैसे आपण अशा गरजूंच्या हितासाठी वापरु शकतो. माझा वाढदिवस साजरा करण्याइतपत मी मोठा नाही आहे, त्यामुळे याची गरज पण नाही.
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी मार्फत आपण २०१२ पासून वेगवेगळ्या क्षेत्रात काही जनकल्याणाचे उपक्रम घेऊन समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. (www.hiranyagarbhabp.org या आपल्या संकेतस्थळावर काही संक्षिप्त लेखाजोखा आहे)
तुमचे जर माझ्या वर खरे प्रेम आहे तर बुके, भेटवस्तू, केक, बॅनर यामध्ये व्यर्थ खर्च न करता आपल्या हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान ला छोटेसी का होईना देणगी दिली तर आनंद होईल. त्यामुळे काही विधायक कार्य घडतील आणि आपल्या सर्वांनाच ईश्वराकडून आशिर्वाद मिळतील.
हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजनी
SBI account number-
40866562999
IFSC code- SBIN0007386
माझ्या क्षमते नुसार, होईल तेवढी समाजसेवा ईश्वर माझ्या कडून करवून घेत असतोच. पण यात माझ्या बहुतांश मित्रांचा व आप्तेष्टांचा वाटा असावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना सदैव आहे.
माझ्या विचाराचे अनुकरण, समाजकार्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन हेच माझ्यासाठी मोठी प्रेमरुपी भेट आहे..!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#जय_श्रीराम
– डॉ. किरण नारायण करेवाड