हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली “हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी” कुस्ती स्पर्धा
हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठाण, सिरंजणीच्या सौजन्याने पै. कै. किशन नागोबा वासुदेव यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली “हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी” कुस्ती स्पर्धा दिनांक ०८ एप्रिल २०२३ शनिवार रोजीउत्साहात पार पडली. कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पैलवानांनी हजेरी लावली होती. स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती झाल्या.
शेवटची मानाची कुस्ती निळा जि. नांदेड येथील पै. राजू कदम व नाशिक येथील पै. योगेश पाटील यांच्यात अतिशय तुल्यबळ व अटीतटीची लढत झाली. यात राजू पैलवान यांनी बाजी मारली व हिरण्यगर्भ सिरंजणी केसरी चा मान मिळवला.
प्रसंगी गावातील कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान श्री रामा काशीबा सुर्यवंशी, श्री जयवंतराव दावजी देशमाने, श्री बब्रुवाहन भुमाजी गडमवार व सामाजिक क्षेत्रातून सेवानिवृत्त वन अधिकारी श्री भीमराव गेंदाजी कावळे, श्री. संभाजी लक्ष्मण सुरोशे यांना हिरण्यगर्भ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या जीवनावर श्री भाटे सर यांनी अतिशय सुरेख भाषेत प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनर साहेब यांनी जातीने उपस्थिती लावून पोलिस टिम मार्फत चोख बंदोबस्त दिला. त्याच बरोबर गोल्ला गोलेवार समाजाचे प्रान्त अध्यक्ष श्री. भुमन्ना अकेमवाड, जि अध्यक्ष रमेशजी बद्दीवार, प्रकाश करेवाड, संतोष अकेमवाड, बकन्ना कोमलवाड व तसेच श्री परमेश्वर गोपतवार, श्री देवसरकर गुरुजी, श्री शिवानंद तिमापुरे, श्री रुक्माजी कागळे, श्री किशन देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे धावते समलोचन श्री अंगुलवार सर, श्री भाटे सर व श्री लक्ष्मण लिंगमपल्ली यांनी केले.
श्री माधव कागळे, श्री तुकाराम वासुदेव, श्री हनुमंत कोरडे यांनी बक्षिस वितरण कक्ष उत्तम रित्या हाताळले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण चे सदस्य श्री गणेश कुरमुलवाड, श्री रामेश्वर वासुदेव यांनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धा आयोजनात पै. श्री निरंजन म्याकलवाड, पै. श्री राजू कोंगरवाड, पै. श्री गणेश भिंबरवाड, पै. हनुमान कलेवाड, पै. गोविंद आदी मित्र परिवाराने परिश्रम घेतल्याबद्दल हिरण्यगर्भ चे सचिव श्री पवन करेवाड यांनी सर्वांचे आभार मानले..