• +91-9604222888
  • हिरण्यगर्भ, सिरंजणी. ता.हिमायत नगर. जि. नांदेड महाराष्ट्र

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी तर्फे ग्रामीण भागातील बाल विद्यार्थ्यांना “हिरण्यगर्भ बाल उजळणी” चे वाटप

Posted By: admin 1 Comment

हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी ता. हिमायतनगर जि. नांदेड ही एक उपक्रमशील संस्था म्हणून परिचित आहे. २०१२ पासून वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम ही संस्था घेत आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात पहिल्या व दुसऱ्या वर्गातील बाल विद्यार्थ्यांना “हिरण्यगर्भ बाल उजळणी” या पुस्तिकेच्या वितरणाचा उपक्रम घेण्यात आला. हिमायतनगर तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.

हिमायतनगर तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम घेण्यात आला. भागातील सिरंजणी, एकंबा, सेलोडा, कोठा तांडा, कोठा वाडी, कोठा (ज), बोरगडी तांडा १,बोरगडी तांडा २, बोरगडी गाव, धानोरा, मंगरुळ या ठिकाणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी “हिरण्यगर्भ बाल उजळणी” चे वितरण केले. असे गावोगावी जाऊन पुस्तिकेच्या ५०० प्रतीचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील बाल विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करुन त्यांच्या वर चांगले संस्कार व्हावेत हा मुख्य उद्देश या शैक्षणिक उपक्रमाचा होता.

या उजळणीत बाल विद्यार्थ्यांना आवडतील अश्या सुरेख चित्रांसह, अंक, पाढे, चौदाखडी, इंग्रजी लिपी, यांचा समावेश केला आहे. तसेच बाल मनावर उत्तम संस्कार व्हावेत या हेतूने मनाचे श्लोक सुविचार, आपले दैवत, चांगल्या सवयी आणि बालगीते अशा अनेक चांगल्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.


ही अतिशय सुंदर पुस्तिका तयार करण्यासाठी पालघर येथील आदर्श शिक्षक श्री आनंद आनेमवाड, नांदेड चे ग्राफिक डिझायनर श्री श्याम कापसे, मुंबई स्थित चित्रकार श्री सुरेश कोमलवाड, प्रिंटींग साठी रजल कॉपी सेंटर मिरारोड चे विशाल भाई, रतन भाई या सर्वांचे सहकार्य लाभले. उजळणी च्या कंटेन्ट आणि सुधारणेसाठी संस्थेचे पदाधिकारी श्री आडेलु भाटे सर, श्री गणेश कुरमुलवाड, श्री रामेश्वर वासुदेव यांनी परिश्रम घेतले.

गावोगावी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन उपक्रमाचे सादरीकरण व उजळणी वाटप करण्यासाठी सिरंजणी चे युवा नेते, सरपंच प्रतिनिधी श्री पवन करेवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री.गौतम दवणे सरपंच कोठा (ज), श्री.राजू कदम कोठा, श्री प्रल्हाद भाटे, श्री चंपतमामा भदेवाड, श्री राजू गड्डमवार, श्री.लक्ष्मण तिमापुरे , श्री लक्ष्मण करेवाड यांनी योगदान दिले.
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री नारायण करेवाड यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या आणि भरीव योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

One thought on “हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजणी तर्फे ग्रामीण भागातील बाल विद्यार्थ्यांना “हिरण्यगर्भ बाल उजळणी” चे वाटप

  • Pankaj Gudhekar
    July 8, 2022 at 9:18 am

    अतिशय सुंदर व छान उपक्रम 👌

Leave a Comment