राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ग्रामचैतन्य श्रमदान अभियानात सहभागी झालेल्या ८२ युवकांचा हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी कडून सत्कार
मागील दहा वर्षापासून शिक्षण, आरोग्य, क्रिडा, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम घेणारी संस्था म्हणजे आमचे हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजणी.
गावाचे आरोग्य चांगले राहो या उद्देशाने गावात युवा नेते श्री पवन करेवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामचैतन्य श्रमदान अभियान राबविण्यात आले होते.
गावातील युवकांनी पवन च्या हाकेला साद देत गावातील घाणीचे साम्राज्य दुर केले.
स्वतः हातात फावडे, झाडू घेत जवळपास ८२ आदर्श युवकांनी प्रत्येक मोहिमेत सामील होत गाव स्वच्छ करण्याचे विधायक कार्य केले.
या महान कार्यासाठी पुर्ण जिल्ह्यातून चांगले अभिप्राय आहेत.
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान कडून सिरंजणी च्या ग्रामचैतन्य श्रमदान अभियानात सहभागी झालेल्या युवकांचा गौरव सोहळा दि. ११ जानेवारी रोजी मोठ्या थाटात पार पडला.
याच सोहळ्यात सिरंजणी गावातील सेवानिवृत्त प्राध्यापक आदरणीय श्री मारोती जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला. व पुढिल सेवानिवृत्त आयुष्यासाठी गावकर्यांकडून व हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी मुंबईहून
डॉ. सतिश शेट्टी सर
(चेअरमन, तुंगा ग्रुप ऑफ हॉस्पिटल)
डॉ. हेमल बार्छा
( संस्थापक अध्यक्ष Curves & Smiles)
डॉ. गुरुप्रसाद शेट्टी
( कान, नाक, घसा तज्ञ)
हे मान्यवर उपस्थित होते.
व तसेच
श्रीमती संजीवनीताई देशपांडे
( दुर्गा वाहीनी जिल्हा कार्यवाह)
श्री. मारोती जाधव सर
( सेवानिवृत्त प्राध्यापक)
श्री राष्ट्रपाल वाठोरे
( भारतीय सेना)
श्री आशिष भाऊ सकवान
( तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी हिमायतनगर)
श्री राम भाऊ सुर्यवंशी
( तालुकाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा)
श्री मोहन ठाकरे
( तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिमायतनगर)
श्री खंडू चव्हाण
( शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी हिमायतनगर)
श्री. प्रभू कल्याणकर
( सरपंच, ग्रामपंचायत एकंबा)
श्री संजय सुर्यवंशी
( सरपंच, खडकी)
श्री सत्यशील राऊत
( पोलीस पाटील, सिरंजणी)
श्री शिलवंत कोठेकर
( पंचायत समिती उपसभापती हिमायतनगर)
श्री गौरव सुर्यवंशी, श्री वामन मिरासे , श्री अभिलाष जैस्वाल, श्री लक्ष्मण टेकाळे, श्री राजू गंधम, श्री रितेश पिंचा हे मान्यवर उपस्थित होते.
सर्वांचे मनःपुर्वक आभार. 🙏
हा रम्य सोहळा पाहण्यासाठी सकाळी पावसाने पण अक्षरशः हजेरी लावली होती. पण नंतर निसर्गाने साथ दिली, कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला नाही. त्यामुळे निसर्गाचे पण आभार.