हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्
दिनांक 6 आगस्ट 2019 रोजी कु. आराध्या च्या वाढदिवसा निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीर.
दिनांक: 6 आगस्ट 2019
आपल्या कुटुंबातील चिमुकल्यांचे वाढदिवस काही सामाजिक उपक्रमाने साजरे करण्याची संस्कृती हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान बऱ्याच वर्षांपासून जोपासत आहे.
हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान सिरंजनी चे अध्यक्ष श्री नारायण गंगाराम करेवाड यांची नात कु.आराध्या किरण करेवाड हिचा चौथा वाढदिवस याही वर्षी अशा एका उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे.
दिनांक 6 आगस्ट 2019 रोजी कु. आराध्या च्या वाढदिवसा निमित्ताने
उत्तन-भायंदर, जि. ठाणे स्थित
किशन गोपाल राजपुरिया वानप्रस्थाश्रम
याठिकाणी एक मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदरील वृध्दाश्रमात एकुण 110 वयोवृद्ध व्यक्तींना या शिबिराचा लाभ झाला आहे आहे.
उपक्रमाचे काही छायाचित्रे
आजकाल वृद्धापकाळात डायबेटिस, ब्लडप्रेशर, ह्रदयाचे आजार, आॅस्टिओपोरोसिस (Osteoporosis) सारखे हाडाचे आजार इत्यादी खुप सामान्यपणे आढळून येतात. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश आजार बहुधा कोणत्याही लक्षणांशिवाय शरीरात घर करुन बसतात. या आजाराचे वेळेवर निदान होने खुप गरजेचे आहे. यासाठी काही तपासण्या गरजेच्या असतात. या आरोग्य तपासणी शिबीरात ब्लडप्रेशर, रक्तातील शुगर चे प्रमाण, ईसीजी, बि एम आए, गरजेच्या पॅथॉलॉजी टेस्ट, बोन डेंसीटी इत्यादी तपासण्यांचा समावेश होता.
वृद्धापकाळातील बऱ्याच सामान्य आजाराचे निदान होईल व त्यावर वेळीच उपचार घेऊन लाभार्थ्यांचे उर्वरित आयुष्य सुखात जाईल हा प्रामाणिक हेतू ठेवून हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान,सिरंजनी या शिबीराचे आयोजन गुरुकृपा हॉस्पिटल टिम च्या सहकार्याने केले होते.
शिबीर तपासणीने निदान केल्यावर सर्वांना औषधांचे वाटप मोफत करण्यात आले.
लाभार्थ्यांना वृध्दपकाळात संक्रमित रोगांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढावी या हेतूने सर्वांनाच मल्टिव्हिटामीन,कॅल्शियम, बी काॅम्प्लेक्स, भुक वाढण्याचे टॉनिक, गॅस, Acidity चे औषध वाटप मोफत करण्यात आले.
शिबीराच्या लाभार्थ्यांनी बहुसंख्य आजी आजोबा च्या रुपाने कु. आराध्या हिला अनंत आशिर्वाद दिले तसेच मनापासून सेवाभावाने शिबीरात कार्य केलेल्या सर्व गुरुकृपा हॉस्पिटल टिम चे तोंडभरून कौतुक केले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिप्राय
उपक्रमासंभंधी काही प्रतिक्रिया खालीलप्रमाणे मिळाल्या आहेत.