मोफत ऑनलाईन पिकविमा भरणे शिबीर आयोजक हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान
मोफत ऑनलाईन पिकविमा भरणे शिबीर
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो व सेतू सुविधा व खाजगी नेट कॅफे वाल्यांकडून पीक विम्याचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 100 ते 200 रु प्रति अर्ज प्रमाणे पैसे घेतले जातात. सिरंजनी गावातील व भागातील शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टी पासून दिलासा देण्यासाठी हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान, सिरंजनी ने पुढाकार घेऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी मदतकेंद्र चालवून शेतकरी बांधवांना निःशुल्क सेवा दिली.
1. हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान ने पीक विमा मदतकेंद्र खूप प्रभावी पणे चालवले त्याबद्दल प्रथम संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. संस्थेच्या ह्या कार्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत तर झालीच आहे सोबतच शेतकरी बांधवांचा मोठा वेळ वाचला आहे संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाओ ह्याच शुभेच्छा…
-रामेश्वर बब्रुवाहन गड्डमवार
(भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष हिमायतनगर)